❤️ईसीजी झाला सोप्पा💓भाग -18

❤️ईसीजी झाला सोप्पा💓

भाग -18

🌹 डॉ. पद्मनाभ केसकर
आत्ययिक चिकित्सा तज्ञ , पुणे
( Emergency Management Expert, Pune)
Mobile- 9762258650

या भागामध्ये आपण QRS COMPLEX संदर्भातील अजून काही इसीजी मधील एबनॉर्मलिटीची चर्चा करणार आहोत. 

🍁Ventricular Tachycardia

जेव्हा कधी तुम्हाला इसीजी मध्ये Broad QRS complex दिसतील ( 3 small squares पेक्षा जाड ) आणि बरोबरीने हार्ट रेट 100 पेक्षा जास्त असेल तसेच P wave अबसेन्ट असेल तर तो रिदम Ventricular असतो आणि त्याला Ventricular Tachycardia असे समजले जाते. ( Regular Broad Complex Tachycardia)

Ventricular Tachycardia मध्ये Impulse हा SA NODE मध्ये जनरेट होण्याच्या ऐवजी व्हेंट्रिकलमध्ये जनरेट होतो. जर का इंपल्स Ventricle मध्ये एकाच ठिकाणाहून जनरेट झाला ( Originates from single focus in the Ventricle) आणि त्याने Tachycardia निर्माण केला तर त्याला Monomorphic Ventricular Tachycardia असे म्हणतात. ज्यामध्ये सर्व QRS COMPLEX ची मॉर्फोलॉजी एकसारखी असते कारण ते Ventricle मधून एकाच ठिकाणावरून ओरिजिनेट झालेले असतात. ( खालील इसीजी बघा )


याउलट Impulse हा व्हेंट्रिकल मध्येच जनरेट झाला पण तो विविध ठिकाणावरून जनरेट झाला ( Impulse originate from multiple foci in Ventricle) आणि त्यामुळे Ventricular Tachycardia निर्माण झाला तर त्याला Polymorphic Ventricular Tachycardia असे म्हणतात. यामध्ये QRS COMPLEX ची मॉर्फोलॉजी ही वेगवेगळी दिसते. म्हणजे प्रत्येक QRS COMPLEX उंची किंवा जाडी ही वेगवेगळी दिसते कारण ते वेगवेगळ्या ठिकाणावरून ओरिजिनेट झालेले असतात. ( खालील इसीजी बघा )

Ventricular Tachycardia rhythm हा with pulse पण मिळू शकतो किंवा Without pulse पण मिळू शकतो. Vtach without pulse असल्यास defibrillation करावे लागते. तेच जर का Vtach with pulse असल्यास Amideron ( Carderon ) , Lidocaine इत्यादी औषधे देऊन ट्रीटमेंट करता येते. ( Chemical Cardioversion) 

🍁Torsades de pointes (TdP)

हा पण Broad QRS complex Tachycardia चाच प्रकार आहे. यामध्ये QT PROLONGATION मिळते तसेच हे ओळखण्याची विशेषता म्हणजे QRS Complex हा Isoelectric line भोवती स्प्रिंग प्रमाणे twist झाल्यासारखा दिसतो. याच्या ट्रीटमेंट मध्ये MgSo4 द्यावे लागते. ( खालील इसीजी बघा )

🍁Ventricular Fibrillation

हा पण रिदम Ventricular आहे. Ventricular fibrillation (VF) is the most important shockable cardiac arrest rhythm. त्वरित उपचार हॉस्पिटलमध्ये झाले नाहीत तर रुग्णाचा मृत्यू संभवतो कारण हा रिदम Pulseless असतो. 

यामध्ये इंपल्स Ventricle मध्येच जनरेट होतो पण त्यामुळे Ventricular Contraction होण्याच्या ऐवजी केवळ हृदय थरथरते ( Quivering of heart ) त्यामुळे Circulation होत नाही. अशावेळी त्वरित CPR चालू करावी लागते आणि हा रिदम सप्रेस करण्यासाठी defibrillation करावे लागते. ECG मध्ये P - QRS - T अशा पद्धतीने wave दिसत नाहीत केवळ Chaotic irregular activity दिसते आणि fibrillatory waves दिसतात ( खालील इसीजी बघा ) 
🍁Premature Ventricular Contraction ( PVC )

या पद्धतीच्या ECG Abnormality मध्ये नॉर्मल पद्धतीने चालू असलेल्या रिदम मध्ये अचानक Ventricle मधून एखादा Ectopic Focus ऍक्टिव्हेट होतो आणि तो इंपल्स जनरेट करतो अर्थात हा इंपल्स Ventricle मधून जनरेट झालेला असल्याने तो ब्रॉड असतो ( तीन छोट्या घरांपेक्षा जास्त ) त्यामुळे तो लगेच ओळखू येतो. याला प्री मॅच्युअर म्हटलेलं असल्याने या ( VPC ) च्या अगोदर P wave प्रेझेंट नसते.

A premature ventricular complex (PVC) is a premature beat arising from an ectopic focus within the ventricles. 

⭕Broad QRS complex (≥ 120 ms) with abnormal morphology

⭕Premature — i.e. occurs earlier than would be expected for the next sinus impulse.

हे Premature Ventricular Complex / Contraction ( PVC ) Unifocal किंवा Multifocal असू शकते. 

जर का इसीजी मधील सर्व PVC ची मॉर्फोलॉजी एकसारखी असेल तर त्याचा अर्थ ते Ventricle मधून एकाच ठिकाणावरून ओरिजिनेट झाले आहेत अर्थात ते Unifocal PVC आहे.


याउलट ईसीजी मधील PVC ची मॉर्फोलॉजी वेगवेगळी असेल म्हणजेच उंची जाडी इत्यादी तर त्याचा अर्थ ते Ventricle मधून वेगवेगळ्या ठिकाणावरून ओरिजिनेट झालेले आहेत अर्थात ते Multifocal PVC आहेत.


🍁इसीजी मध्ये PVC आढळण्याच्या सातत्यतेवरून त्याचे खालील पद्धतीने वर्गीकरण करता येऊ शकते - 

Bigeminy — every other beat is a PVC

Trigeminy — every third beat is a PVC

Quadrigeminy — every fourth beat is a PVC

Couplet — two consecutive PVCs

( खालील इसीजी बघा )


जनरली PVC साठी ट्रीटमेंट लागत नाही. पेशंटला अधून मधून छातीत धडधडणे ( Palpitations) इत्यादी त्रास होतात. पण जर का काही गंभीर कारणामुळे PVC चे निदान होत असेल तर मात्र त्यासाठी ट्रीटमेंट ची गरज पडू शकते.

🍁PVC ची कारणे

Frequent or symptomatic PVCs may be due to:

Anxiety

Sympathomimetics

Beta-agonists

Excess caffeine

Hypokalaemia 

Hypomagnesaemia 

Digoxin Toxicity 

Myocardial ischaemia 

या ईसीजी झाला सोप्पा या सिरीज मधून आपण जनरल प्रॅक्टिस मध्ये ईसीजी मधील अबनॉर्मलिटी कशा पद्धतीने ओळखता येतील याची सोप्या भाषेमध्ये माहिती घेतली. अजून पुढच्या टप्प्यामध्ये याहून सखोल माहिती घेण्याचा प्रयत्न करू.

🌹 डॉ. पद्मनाभ केसकर
आत्ययिक चिकित्सा तज्ञ , पुणे
( Emergency Management Expert, Pune)
Mobile- 9762258650

Comments

  1. Explained with very simple language but covering desired info. Very nice. I look forward for other episodes

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

💓ECG झाला सोप्पा !💓भाग - १

💓ECG झाला सोप्पा💓भाग २

💓ECG झाला सोप्पा💓भाग - ३