गब्बर से तुम्हे सिर्फ एक ही आदमी बचा सकता है और वो है ...खुद गब्बर ! # Omicron Stories- part 2

#कोरोना_डायरीज
#Omicron_Stories Part- 2 

👺 गब्बर से तुम्हे सिर्फ एक ही आदमी बचा सकता है और वो है ...खुद गब्बर !

🌹डॉ. पद्मनाभ केसकर
Emergency Management Expert , Pune 

शोले चित्रपटातील हा डायलॉग आहे ... गब्बर से तुम्हे सिर्फ एक ही आदमी बचा सकता है और वो है ...खुद गब्बर ! ...

आता याचा संबंध आपल्या कोरोनाशी किंवा नवीन आलेल्या ओमिक्रोन शी काय आहे याचा तुम्ही नक्की विचार करत असाल ... तर हि एक थेरी आहे किंवा एक पॅरलल विचार आहे ... हा ओमिक्रोन च जगाला कोरोना च्या विळख्यातून बाहेर काढू शकतो ! .. किंवा दुसऱ्या शब्दात कोरोना चा ओमिक्रोन हा अवतारच जगाला कोरोनाच्या संकटापासून वाचवू शकतो !!
( काट्याने काटा काढणे ..)

©️डॉ. पद्मनाभ केसकर

आता ही विचारधारा कशी पुढे आली आणि त्याच्या मागचा बेस् काय आहे ते बघू ...

मागील भागात आपण बघितलं की केवळ कोरोनाचाच व्हायरस असे नाही तर सर्वच व्हायरस हे जीवसृष्टीत टिकून राहण्यासाठी स्वतःमध्ये जनुकीय बदल घडवत असतात ज्याला आपण mutation असे म्हणतो. 

या जनुकीय बदलांमुळे तो व्हायरस टिकून राहण्यासाठी स्वतःमध्ये जे अंतर्बाह्य बदल घडवतो त्यामुळे तो आधीपेक्षा जास्त प्रबळ होत जातो किंवा कालांतराने क्षीण होत जातो ... जेव्हा असे major mutation होते तेव्हा बदल होऊन नवीन निर्माण झालेला व्हायरस हा आधीच्या strain ना दाबून टाकतो आणि स्वतः सक्रिय होतो ...

कोरोनाचा मुळ व्हायरस ज्याला आपण Wuhan virus असे म्हणतो किंवा SARS-CoV2 असे त्याचे नामकरण केले होते. जो 2019 सालच्या शेवटाला कार्यरत झाला आणि त्याने जगावरती कोरोना चे संकट आणले .... त्या मूळ व्हायरस मध्ये mutation होऊन अनेक बदल होत गेले .. आणि त्याला त्या पद्धतीने नावे दिली गेली जसे की - 

*अल्फा* ( UK Variant - B.1.1.7 )
*बीटा* ( South Africa Variant - B.1.351 )
*गेमा* ( Brazil Variant - P.1 ) 
*डेल्टा* ( Indian Variant- B.1.617.2 ) 

मूळ Wuhan व्हायरस मध्ये बदल होत गेले. मुख्यता व्हायरसच्या बाह्य काटेरी आवरणात अर्थात स्पाइक प्रोटीन मध्ये जास्ती प्रमाणात बदल झाले आणि हा कोरोनाचा व्हायरस बदलत गेला ...

यातील काही Variant हे जास्त प्रमाणात वेगाने इन्फेक्शन पसरवणारे , मध्यम ते तीव्र स्वरूपाचा आजार निर्माण करणारे होते उदाहरणार्थ डेल्टा व्हायरस जो सध्या सुद्धा जगभरामध्ये दहशत माजवून आहे ..

काही Variant च्या काटेरी बाह्य आवरणात जास्त प्रमाणात बदल झाल्याने ते Vaccine ला पुरेशी दाद देत नव्हते उदाहरणार्थ B.1.351 म्हणजेच मागे येऊन गेलेला साउथ आफ्रिकन Variant. 

एकूणच कोणताही mutation होऊन नवीन निर्माण होणारा Variant हा स्वतःची ओळख घेऊन अस्तित्वात येत असतो. आता नुकताच साउथ आफ्रिकेत रिपोर्ट झालेला ओमिक्रोन ( B.1.1.529 ) या Variant मध्ये बाह्य काटेरी आवरणात सुमारे 32 बदल झालेले आहेत. जे अतिशय मोठ्या प्रमाणात झालेले बदल समजले जातात ( जो सगळ्यांना माहिती असलेला डेल्टा variant आहे त्यात बाह्य काटेरी आवरणात म्हणजेच स्पाईक प्रोटीन मध्ये फक्त नऊ बदल झालेले आहेत त्यावरून बत्तीस बदल म्हणजे किती जास्त याचा अंदाज येईल ) 

बाह्य काटेरी आवरणा ( Spike protein ) चा उपयोग व्हायरस शरीरामध्ये किंवा पेशी मध्ये प्रवेश करण्यासाठी करतो. हे काटेरी आवरण जितके जास्त चांगल्या दर्जाचे तेवढी त्या व्हायरसची एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे इन्फेक्शन पसरवण्याची शक्ती जास्त ( More Infectious)

पण एखादा व्हायरस वेगाने पसरत असेल ( More Infectious) तरी तो तीव्र स्वरूपाचा आजार ( severe illness ) निर्माण करेलच असे नाही किंवा मृत्यु दर ( Mortality rate ) वाढवेलच असे नाही .

सध्या ज्या बातम्या किंवा जी माहिती साउथ आफ्रिकन डॉक्टर्स असोसिएशनकडून येत आहे त्यानुसार ओमिक्रोन हा कोरोना व्हायरस चा उपप्रकार काटेरी आवरणातील मोठ्या प्रमाणातील बदलामुळे वेगाने पसरत आहे. 🏃‍♂️🏃‍♂️🏃‍♂️

तसेच याचे बाह्यरूप ( Changes in Spike protein) मोठ्या प्रमाणावर बदललेले असल्यामुळे शरीरातील Immune system या व्हायरसला काहीवेळा ओळखू शकत नसल्याने Vaccine घेऊनसुद्धा किंवा पूर्वी कोरोना होऊन गेलेला असताना सुद्धा आता परत नव्याने इन्फेक्शन लोकांना होत असताना दिसत आहे.

©️ डॉ. पद्मनाभ केसकर

पण ज्या लोकांना या ओमिक्रोन या कोरोनाच्या उपप्रकाराचे इन्फेक्शन होत आहे त्यांना अतिशय सौम्य स्वरूपाचा आजार होत असताना दिसत आहे. त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याची फारशी गरज पडत नाही आहे. अर्थात आहे हा डाटा खूप सुरुवातीचा आहे आणि कमी पेशंट कडून मिळालेला आहे. पण जर का हेच वर्तन या ओमिक्रोन चे भविष्यात पण राहिले तर - 

तो वेगाने मोठ्या समुदायाला बाधित करेल मग भले त्या व्यक्तीला लसीमुळे निर्माण झालेल्या किंवा आधीच्या आजारामुळे निर्माण झालेल्या Covid Antibodies असोत अथवा नसोत ... पण disease Severity किंवा fatality rate कमी असल्यामुळे समूहाला बाधा होईल पण Hospitalization, Mortality होणार नाही अशी अपेक्षा आहे. ( considering present data ) 

💪 हा ओमिक्रोन बलवान ( Virulant ) असल्याने तो सद्यमीतिला हाहाकर माजवणाऱ्या डेल्टा Variant ला Survival for fittest या न्यायाने रिप्लेस करेल. सध्या डेल्टा वायरस हा जगभरात चिंतेचा विषय आहे कारण तो तीव्र स्वरूपाचा आजार ( Severe disease ) तसेच Hospitalization आणि मृत्यू दर वाढवत आहे. या डेल्टा व्हायरस ला रिप्लेस करण्याचे काम आणि जगाला डेल्टा व्हायरस पासून सुटका करण्याचे काम कदाचित ओमॅक्रोन करेल अशी शास्त्रज्ञाना आशा वाटते.

©️ डॉ. पद्मनाभ केसकर

तसेच जी लोक या ओमिक्रोन मुळे बाधित होतील त्यांना सौम्य स्वरूपाचा आजार होऊन Vaccine पेक्षा चांगल्या दर्जाच्या नैसर्गिक Antibodies निर्माण होतील ज्या त्या व्यक्तीचे भविष्यातील कोरोनाच्या आजारापासून संरक्षण करतील अशी आशा आहे.

👊 अशी ही काट्याने काटा काढण्याची थेरी कितपत सत्यात येते हे येणारा काळच ठरवेल ... जर का खरोखर असे assumption प्रमाणे झाले तर ज्या कोरोना वरती मात करण्यासाठी मानवी जमात झगडत आहे त्याच कोरोनाला , कोरोनाच आटोक्यात आणेल... आणि मग शोले मधील तो डायलॉग वेगळ्या अर्थाने म्हणावा लागेल - कोरोना से तुम्हे सिर्फ एक ही आदमी बचा सकता है और वो है - कोरोना (ओमॅक्रोन ) !

( सद्यमीतिला ओमिक्रोन च्या पेशंटचा खूप कमी प्रमाणात डाटा उपलब्ध आहे. ही केवळ एक विचारधारा आहे. लोकांनी कोरोना सदृश्य वर्तनाचे आचरण करणे आणि जास्तीत जास्त लोकांनी लसीकरण करून घेणे हा उपाय अवलंबणे गरजेचे आहे  )

🌹डॉ. पद्मनाभ केसकर
Emergency Management Expert, Pune

Comments

Popular posts from this blog

💓ECG झाला सोप्पा !💓भाग - १

💓ECG झाला सोप्पा💓भाग २

💓ECG झाला सोप्पा💓भाग - ३