या कोरोना च्या लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांचे करायचे काय ?

या कोरोना च्या लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांचे करायचे काय ?

🌹डॉ. पद्मनाभ केसकर

Emergency Management Expert , Pune
Mobile- 9762258650

भारताने आता जवळपास 19 कोटी लसीकरणाचा टप्पा गाठला आहे. आणि दिवसोंदिवस त्यात भर पडतच आहे.

जगभरातील देशांचा विचार केला तर 19 कोटी लसीकरण ही खूप मोठी संख्या आहे . चायना आणि अमेरिका यांच्या पाठोपाठ या संख्येचा नंबर लागतो.

मुळातच आपल्या देशाची लोकसंख्या खूप असल्याने साठ टक्के लोकांच्या लसीकरणाचा टप्पा गाठायला आपल्याला वेळ लागणार आहे.

पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जर का आपण लसीकरणा वरती एवढा मोठा खर्च करत असू व वेळ देत असू तर त्याचा फायदा हा केवळ कोरोना पासून संरक्षणासाठीच करून न घेता इकॉनोमी सुधारण्यासाठी पण करून घेतला पाहिजे.

आत्तापर्यंत असे लक्षात आले आहे की ज्या लोकांचे दोन्ही डोस घेऊन 14 दिवस झालेले आहेत - त्यांच्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती चांगल्यापैकी निर्माण झालेली असते व त्यांना नव्याने इन्फेक्शन होण्याचा धोका खूप कमी असतो.

🍁 त्यामुळे ज्यांचे लसीकरणाचे दोन्ही डोस झालेले आहेत व तसे सर्टीफिकीट ज्यांच्याकडे आहे , ते सर्टीफिकीट म्हणजे त्यांचा इम्युनिटी पासपोर्ट आहे असे गृहीत धरावे व त्यांना मास्क व इतर त्रिसूत्रीचा वापर करून लॉकडाउनच्या काळामध्ये व्यवसायासाठी तसेच भारत भर प्रवासासाठी कोणत्याही rt-pcr किंवा Antigen टेस्ट शिवाय फिरण्याची मुभा द्यावी.

यामुळे व्यवसाय वृद्धी पण होईल आणि डबघाईस गेलेला पर्यटन व्यवसाय तसेच एअर इंडस्ट्री यांना पण चालना मिळेल.


तसेच अनेक उद्योग धंद्यांमध्ये सतत कामगारांचे जे टेस्टिंग करावे लागते त्यामुळे व्यवसाय वरती जो ताण येतो तो पण कमी होईल.

अनेक जण यासाठी लागणाऱ्या RT PCR/ Antigen टेस्ट सरकारी हॉस्पिटल मधून करून घेतात . त्यामुळे खरोखरच्या रुग्णांसाठी या टेस्ट ची उपलब्धता किंवा लागणारा वेळ यावरती ताण येतो.

🤔 आता काहीजण म्हणतील की दोन्ही लसीचे डोस घेऊन सुद्धा पॉझिटिव्ह झालेले लोक आहेत मग अशी परवानगी देणे उचित आहे का ?

एक लक्षात घ्या दोन्ही लसीचे डोस घेऊन चौदा दिवस उलटल्यानंतर पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची संख्या अत्यल्प आहे. तसा तर धोका rt-pcr टेस्ट किंवा एंटीजन टेस्ट करून परवानगी दिल्यानंतर पण आहेच. कारण आपल्याला माहिती आहे की RT-PCR टेस्टमध्ये सुद्धा 30% तर Antigen टेस्टमध्ये तर 50% फॉल्स निगेटिव्ह रिझल्ट येऊ शकतात. म्हणजेच इन्फेक्शन असून सुद्धा निगेटिव रिपोर्ट येऊ शकतात.


त्या तुलनेत तर दोन्ही डोस घेऊन पॉझिटिव्ह आलेल्यांची संख्या खूपच कमी आहे आणि त्यांना सुद्धा आपण मास्क सतत वापरायला सांगणारच आहोत.


अमेरिका , इस्त्राईल इत्यादी देशांनी तर लसीचे दोन्ही डोस झालेल्या लोकांना बिना मास्क प्रवास करण्याची व फिरण्याची परवानगी दिली आहे.

मी तर तसे करा असे म्हणतच नाही दोन्ही डोस झालेल्या लोकांना मास्क व इतर सुरक्षिततेचे उपाय पाळून मुक्तसंचार करण्याची परवानगी द्यावी असे म्हणत आहे.

आंतरजिल्हा आंतरराज्य , आंतरदेश प्रवासासाठी त्यांना कोणत्याही RT-PCR किंवा Antigen टेस्टची सक्ती करू नये.

दोन्ही डोस घेतलेल्या लोकांना मुक्तपणे व्यवसाय करू द्यावा.

एक लक्षात घ्या कोरोना हा पुढील काही वर्ष असाच इथे राहणार आहे . त्यामुळे वारंवार लॉक डाउन करणे , प्रवासाला बंदी घालणे, व्यवसाय वरती बंधने आणणे ... हे अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने उचित नाही.

✅त्यामुळे जर का लसीकरणावरती एवढा खर्च आणि वेळ घालवत असू तर त्याचा फायदा नक्कीच करून घेतला पाहिजे. आणि त्यांचे लसीचे दोन्ही डोस झाल्याचे सर्टीफिकीट हे इम्युनिटी पासपोर्ट म्हणून स्वीकारले पाहिजेत.

हे माझे वैयक्तिक मत आहे. मतमतांतरे असू शकतात.

🌹डॉ. पद्मनाभ केसकर
Emergency Management Expert , Pune
Mobile- 9762258650

Comments

Popular posts from this blog

💓ECG झाला सोप्पा !💓भाग - १

💓ECG झाला सोप्पा💓भाग २

💓ECG झाला सोप्पा💓भाग - ३