⭕Hypoglycaemia - A Silent Killer

⭕Hypoglycaemia - A Silent Killer

🌹डॉ. पद्मनाभ केसकर
EMS Instructor,  Ruby Hall Clinic,  Pune 
Mobile  - 9762258650

आजचा हा लेख डॉक्टर्स आणि डायबेटीस असणारे सर्वसामान्य रुग्ण,  या दोघांनाही उपयोगी पडणार आहे .यात मी Hypoglycaemia कसा ओळखावा ? तो का होतो ?  त्याची ट्रीटमेंट कशी करावी या संबंधी मार्गदर्शन केले आहे .

✅ Hypoglycaemia अर्थात रक्तातील शर्करा अचानक कमी होणे हा एक डायबिटीस असलेल्या पेशंट साठी अतिशय घातक परिणाम आहे जो पेशंटच्या आत्मविश्‍वासाला धक्का पोहोचवतो.

🛑 वारंवार होणारे हायपोग्लायसेमिया चे अटॅक हे पेशंटच्या मेंदूच्या क्रियांवर घातक परिणाम करतात ( Neurological impairment ) .

वाढलेली रक्त शर्करा जशी घातक तसेच अचानक कमी झालेली रक्तातील साखर ही शरीरावर तितकेच घातक परिणाम करते. 

✅ Human brain requires continuous supply of blood glucose . Glucose is a source of energy for our body .

अचानक कमी झालेल्या रक्तातील साखरे मुळे मानवी मेंदू हा पेशंटमध्ये खालील लक्षणे उत्पन्न करतो - 

⭕गोंधळाची स्थिती निर्माण होणे ( Confusion) 
⭕ विस्मरण ( Memory loss ) , नकारात्मकता ( Negativity ) , नैराश्य येणे ( Depression) 
⭕ चक्कर येणे ( Giddiness) , खूप थकवा येणे ( Fatigue) 
⭕ डोळ्यासमोर अंधुक दिसणे ( blurred vision )  किंवा दोन प्रतिमा दिसणे ( Double vision ) 
⭕ बोलण्यास कष्ट होणे ( Difficulty in speaking) किंवा तोतरेपणा येणे ( Slurred speech ) 

🛑रक्तातील शर्करा अत्याधिक कमी झाल्यास पेशंटला फिट ( Convulsions) पण येऊ शकतात .
( हे मुख्यत्वे करून डायबिटीस ची औषधे घेऊन अल्कोहोलचे अत्याधिक सेवन केल्यास आढळून येते. डायबिटीस च्या पेशंट ने उपाशीपोटी जर का अत्याधिक अल्कोहोल सेवन केले तर रक्तातील साखर धोकादायकरित्या कमी होऊन पेशंटला फिट येऊ शकते ) त्यामुळे त्यांची फिट थांबवण्यासाठी लवकरात लवकर त्यांना ग्लूकोज देणे हे फार महत्त्वाचे असते .

रक्तातील साखर जेव्हा अचानक कमी होते तेव्हा शरीराच्या दृष्टीने ती युद्ध परिस्थिती असते त्यामुळे अशावेळी रक्तात अड्रेनलीन ( Adrenalin ) आणि Glucagon ची पातळी वाढते आणि त्यामुळे खालील स्वरूपाची लक्षणे हायपोग्लायसेमिया च्या पेशंट मध्ये दिसतात - 

⭕छातीत धडधड वाढणे ( Palpitations) तसेच हृदयाची गती वाढणे ( Tachycardia) .
⭕ अत्याधिक घाम येणे ( Excessive Sweating ) तसेच गरम होत असल्याची भावना होणे ( Warmath ) 
⭕ पोटात खड्डा पडल्याचे जाणवणे ( Hunger) 
⭕ डोकेदुखी ( Headache ) ,  मळमळ ( Nausea ) , उलटी ( Vomiting) , तसेच पोटात कालवणे ( Abdominal discomfort)

✅ वारंवार होणाऱ्या अशा हायपोग्लायसेमिया च्या अटॅक मुळे पेशंटचे Hospitalization वाढते . 

तसेच पेशंटचा आत्मविश्वास खच्ची झाल्याने त्याच्या दैनंदिन जीवनावर खूप मोठा परिणाम होतो . 

 कारण रक्तातील साखर कमी झाल्यानंतर उत्पन्न होणारी स्थिती ही त्या पेशंटच्या दृष्टीने आणि त्याच्याबरोबर असणाऱ्या नातेवाईकांच्या दृष्टीने पण भीतीदायक असते . 

🤔 कोणत्या कारणामुळे वारंवार हायपोग्लायसेमिया उत्पन्न होऊ शकतो ?
( Causes of Hypoglycaemia) 

रक्तातील साखरेची पातळी अचानक कमी होणे ही स्थिती मुख्यत्वेकरून ज्यांना डायबेटीस ची औषधे चालू आहेत किंवा जे पेशंट इन्शुलिन घेत आहेत त्यांच्यामध्ये जास्ती करून आढळून येते . 

औषधाचा ( OHA ) किंवा इन्सुलिनचा डोस जास्ती झाला किंवा औषध घेतल्यानंतर पुरेसे खाणे झाले नाही तर पेशंटची साखर अचानक कमी होऊन पेशंटला त्रास होतो . 

कधीकधी दिवसा मधून ठराविक वेळी हायपोग्लायसेमिया होतो व इतर वेळी रक्तातील साखर जास्ती राहते . 

म्हणजे पेशंटची Fasting आणि PP  ब्लड शुगर चेक केली तर साखरेचे प्रमाण जास्ती दिसते ...  म्हणून औषधांचा डोस वाढवला तर दिवसातल्या काही वेळी ही साखर अचानक कमी होते .... साखर कमी होत आहे म्हणून औषधाचा डोस कमी केला तर ब्लड शुगर चा रिपोर्ट वाढलेला मिळतो ( Vicious cycle ).

ही डायबिटीस च्या ट्रीटमेंट मधील फार अवघड परिस्थिती असते अशावेळी पेशंटला शॉर्ट एक्टिंग इन्शुलीन देऊन रक्तातील साखरेचे नियंत्रण करावे लागते. किंवा काही तोंडाने घ्यायच्या गोळ्या येतात ज्याच्यामुळे हायपोग्लायसेमिया होत नाही.

मुख्यत्वेकरून सल्फोनीलुरियास ( Sulfonylureas )  गटातील औषधे जर का पेशंटला डायबिटीस साठी सुरू असतील ( उदा. Glimipride , Glibineclamide इत्यादी)  तर  हायपोग्लायसेमिया चा धोका वृद्ध लोकांमध्ये जास्ती संभवतो .

Sulfonylureas मधील त्‍यातल्‍या त्‍यात Gliclazide हे औषध शॉर्ट एक्टिंग असल्याने तुलनात्मकदृष्ट्या हायपोग्लायसेमिया होऊ नये म्हणून सेफ समजले जाते .

वारंवार हायपोग्लायसेमिया निर्माण होत असल्यास अशा वेळी पेशंटचे औषधोपचार बदलून त्यांना हायपोग्लायसेमिया उत्पन्न न करणारी तुलनात्मक दृष्ट्या सुरक्षित असणारी औषधे ( उदा . Metformin , DPP4 Inhibitors म्हणजे सर्व Gliptin  जसे की - Teneligliptin , Vildagliptin इत्यादी ) औषधे सुरू करणे महत्वाचे असते.

🤔 Hypoglycaemia किंवा रक्तातील साखर अचानक कमी होणे हा प्रकार फक्त डायबेटिस असणाऱ्या लोकांनाच होतो का?

असे काही नाही ज्यांना डायबेटीस नाही त्यांच्यामध्ये सुद्धा हायपोग्लायसेमिया झालेला आढळून येतो पण त्याचे प्रमाण हे तुलनात्मकदृष्ट्या कमी असते.

✅ डायबेटीस असणाऱ्या रुग्णांमध्ये रक्तातील साखरेची पातळी 70 mg /dl पेक्षा कमी झाली तर हायपोग्लायसेमिया झाला असे समजले जाते.

✅ तर डायबेटीस नसलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखरेची पातळी 50 mg /dl  पेक्षा कमी झाली तर हायपोग्लायसेमिया झाले असे समजले जाते.

ज्या रुग्णांना डायबेटीस नाही त्यांच्यामध्ये काही कारणाने इन्शुलिनचे स्त्रवण जास्ती झाले तर अचानक रक्तातील साखर कमी होते . 

बरेचदा कार्बोहायड्रेट जास्ती असलेले अन्नपदार्थ खाण्यात आले तर शरीराकडून त्याचे पाचन करण्यासाठी स्वादुपिंडा कडून ( Pancreas) जास्ती प्रमाणात इन्शुलिनचे स्त्रवण होते आणि अचानक रक्तातील साखर कमी होते आणि  पोटात खड्डा पडल्यासारखे होते  घाम फुटतो , हाता पायांचा थरकाप होतो याला Reactive Hypoglycaemia असे म्हणतात. 

✅ हे लक्षण Pre Diabetic कंडिशन असल्याचे दर्शवते... या पेशंटला जर का त्याने त्याच्या दिनचर्येत बदल केला नाही तर नजीकच्या काळात डायबेटिस होण्याची शक्यता असते.

🍁 Hypoglycemia is either - Reactive or Non-Reactive.
 Each type has different causes:

🌸 Reactive hypoglycemia

Reactive hypoglycemia occurs within a few hours after a meal. An overproduction of insulin causes reactive hypoglycemia. Having reactive hypoglycemia may mean that you’re at risk for developing diabetes.

🌸 Non-reactive hypoglycemia

Non-reactive hypoglycemia isn’t necessarily related to meals and may be due to an underlying disease of Liver , Kidney,  Pancreas .

✅ स्वादुपिंडाच्या  ट्यूमर मुळे काहीवेळा जास्ती प्रमाणात इन्शुलिन चे  स्त्रवण होऊन रक्तातील साखर कमी होण्याचा धोका संभवतो .

🍁 Whipple Triad 🍁

Whipple Triad हे हायपोग्लायसेमिया चे अचूक निदान करण्यासाठी Endocrinologist कडून वापरले जाते.
यामध्ये तीन गोष्टींचा अंतर्भाव असतो - 

✅1) रक्तातील कमी झालेली साखरेची पातळी . BSL Lower than 70 mg/ dl in Diabetic patients or BSL lower than 50 mg / dl in Non Diabetic patient or BSL lower than 30 - 40 mg / dl in Neonates ( नवजात अर्भक)

✅ 2) रक्तातील कमी झालेल्या साखरेमुळे उत्पन्न होणारी लक्षणे जी वरती सांगितलेली आहेत. ( Signs and Symptoms of Hypoglycaemia)

3) या पेशंटला ग्लुकोज दिल्यानंतर त्याची सर्व लक्षणे कमी होणे. Relief of Symptoms after ingestion of glucose. 

या तीन गोष्टी एकत्र आल्या तर तो हायपोग्लायसेमिया आहे असे समजले जाते. 

✅ ज्या पेशंटना टाईप 1 डायबिटीस आहे आणि ज्यांना रेग्युलर इन्शुलिनचे इंजेक्शन घ्यावे लागते त्यांच्यामध्ये हायपोग्लायसेमिया चे प्रमाण जास्त आढळते .

🍁रक्तातील साखर अचानक कमी झाल्यास करण्याचे उपचार ( Treatment of Acute Hypoglycaemia)

वरती सांगितल्याप्रमाणे जर का डायबेटिसच्या पेशंटची रक्तातील साखर 70 mg /dl पेक्षा कमी झाली आणि वर उल्लेख केल्याप्रमाणे रक्तशर्करा कमी झाल्याची लक्षणे उत्पन्न झाली तर खालील पद्धतीने त्वरित उपचार करावेत. 

✅ ( रक्तातील साखरेचे त्वरित मापन करण्यासाठी डायबेटिस असलेल्या पेशंट कडे ग्लुकोमीटर असणे गरजेचे आहे)

🌸 Rule Of 15 - 15 - 15 in the management of Hypoglycaemia

जेव्हा हायपोग्लायसेमिया होतो , म्हणजेच रक्तातील साखर कमी होते तेव्हा ती ट्रीट करण्यासाठी पेशंट वारेमाप गोड खातो . त्यामुळे त्यावेळचा हायपोग्लायसेमिया ट्रीट होतो.  पण काही वेळाने रक्तातील साखर खूप वाढते . 

अशा पेशंटचे एकाच वेळी HbA1C म्हणजेच तीन महिन्याची एव्हरेज शुगर वाढलेली दिसते आणि दुसरीकडे पेशंट दिवसातून एकदा तरी हायपोग्लायसेमिया ची कम्प्लेंट करतो.

🌿म्हणून हायपोग्लायसेमिया ट्रीट करताना 15 - 15 - 15 चा रूल वापरावा ... काय आहे हा ट्रीटमेंटचा रुल ?
 
जर का पेशंटची रक्तातील साखर ग्लुकोमीटर वर 70 mg / dl पेक्षा कमी झाली असेल तर 15 ग्रॅम ग्लुकोज द्यावे ( Carbohydrate) त्यानंतर 15 मिनिट थांबावे आणि परत रक्तातील साखर तपासावी ती 15 ने वाढलेली पाहिजे अशा पद्धतीने साधारण 100 mg /dl  च्या वरती रक्तातील साखर जाईपर्यंत करत रहावे. 

✅ जो पेशंट पूर्ण शुद्धीत आहे व व्यवस्थित बोलत आहे त्यालाच तोंडावाटे ग्लुकोज द्यावे. जो पेशंट पूर्ण शुद्धीत नाही त्याला तोंडावाटे साखर , पाणी इत्यादी देण्याचा प्रयत्न करू नये त्यामुळे त्याला ऍस्पिरेशन होऊ शकते ( अन्ननलिकेच्या ऐवजी श्वासनलिकेत साखर पाणी जाणे) 

🍁 साखर वाढवण्यासाठी तोंडावाटे कोणते पदार्थ द्यावेत ?

1 ) Glucon - D पावडर पाण्यात मिसळून देणे किंवा Maza / Frooti इत्यादी कोल्ड्रिंक मध्ये मिसळून देणे. 

2) दोन चमचे मध प्यायला देणे.

3) कोणतेही गोड क्रीमचे बिस्कीट गोड चहाबरोबर देणे.

4) रक्तातील साखर कमी होत आहे याची थोडी सुरुवात वाटत असतानाच गोड कॅण्डी तोंडात ठेवून चघळून खाऊ शकतात .

✅ शक्यतो डायबेटिस असलेल्या व्यक्तींनी त्यांच्या नेहमीच्या जेवणाच्या वेळा चुकवू नयेत तसेच फिरायला जाताना खिशामध्ये गोड कॅन्डी किंवा छोटा बिस्कीट चा पुडा ठेवावा .

🌸 जर का रक्तातील साखर अतिप्रमाणात कमी झाली आणि ती व्यक्ती बेशुद्ध झाली तर काय करावे ?

अशावेळी तोंडावाटे ग्लुकोज किंवा साखर त्यांनी देता येत नाही तर हॉस्पिटल मध्ये जाऊन ग्लुकोजचे सलाईन शिरेवाटे द्यावे लागते ( IV Dextrose - 10 % / 25 %/ 50 % ) . Doctors should be careful while giving Hypertonic Dextrose solutions of more concentration as it will cause Thrombophlebitis - रक्तवाहिनी सूज येऊन कडक् होणे ) 

Type 1 डायबिटीस असलेल्या पेशंट मध्ये अशा पद्धतीने हायपोग्लायसेमिया होवून पेशंट बेशुद्ध होण्याची वारंवार शक्यता असते . 

कधी कधी पेशंट हॉस्पिटलमध्ये नेई पर्यंत स्थिती जास्त खराब होते . अशावेळी रक्तातील साखर वाढवण्यासाठी एक इंजेक्‍शन येते त्याचे नाव आहे - Inj Glucagon.  हे इंजेक्शन  इमर्जन्सी च्या वेळी इन्शुलिनच्या इंजेक्‍शन प्रमाणे त्वचेखाली पेशंट आपल्या पण घेऊ शकतो . ते Pre filled Syringe च्या स्वरूपात मिळते . 

Even Family Physician/ GP can also use Inj Glucagon in emergency when IV access is not possible.  It can be given IM preferably .... if not possible then Subcutaneous. 

शक्यतो हे इंजेक्शन देऊन त्वरित पेशंटला पुढील उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन जावे . कधीकधी Inj Glucagon मुळे Vomiting होण्याची शक्यता असते . त्यामुळे ऍस्पिरेशन होऊ नये म्हणून त्याला एका अंगावरती झोपवावे ( Left lateral position).

✅ जर का पेशंटला दीर्घ काळ परिणाम होणारी डायबिटीस वरील औषधे चालू असतील ( Long Acting OHA जसे की Glimipride इत्यादी ) तर त्या पेशंटला त्या औषधाची रक्तातील पातळी कमी होईपर्यंत परत परत हायपोग्लायसेमिया होऊ शकतो . 

त्यामुळे त्याला 24 तास देखरेखीखाली ठेवण्याची गरज भासू शकते .

🤔 रक्तातील साखर ७०  mg/dl च्या खाली गेली पण रुग्णाला लक्षणे नाहीत असे होऊ शकते का ?

✅ हो ... होऊ शकते .

✅ ज्या पेशंटला Autonomic Neuropathy चा त्रास आहे  त्यांच्यामध्ये Hypoglycaemia झाल्यावर जे एरवी मेंदूकडून आदेश जाऊन Adrenalin स्त्रवते आणि हायपोग्लायसेमिया ची लक्षणे उत्पन्न करते  ... ती क्रिया होत नाही व Adrenalin चे स्त्रवण होत नाही  त्यामुळे Adrenalin च्या अभावी हायपोग्लायसेमियाची लक्षणे उत्पन्न होत नाहीत . 

( Actually Adrenalin release in response to Hypoglycaemia is a good thing as it produces Symptoms such as Palpitations,  Sweating , hunger etc and alerts patient about Hypoglycaemia.  And also increased Adrenalin releases glucose from liver and try to early correct Hypoglycaemia.  But this mechanism get failed in Autonomic Neuropathy) 

✅ काही औषधें जसे कि बीटा ब्लॉकर ( Atenelol , Propranolol etc ) इत्यादो Hypoglycaemia ची लक्षणे मास्क करतात .

✅ वारंवार होणाऱ्या  Hypoglycaemia मुळे ब्रेन चे desensetizaltion होते व रक्तातील साखर कमी  होऊनसुद्धा  Btrain लक्षणे उत्पन्न करत नाही .

🤔 वारंवार होणारा हायपोग्लायसेमिया टाळू शकतो का ?

हो .... औषधोपचारांमध्ये योग्य ते बदल करून वारंवार होणारा हायपोग्लायसेमिया टाळता येऊ शकतो.

✅ वृद्ध व्यक्तींमध्ये रक्तातील साखर एकदम नॉर्मल पातळीवर ठेवण्याचा प्रयत्न जास्ती औषध देऊन करू नये. ( Don't keep to tight control on blood sugar levels of elderly persons,  if they are on medication ) 

नॉर्मल पातळीच्या थोड्या वर जरी रक्तातील साखर राहिली तरी चालेल . त्याने हायपोग्लायसेमिया चा धोका कमी होऊ शकतो . 

पण याचा अर्थ असा नाही की पथ्य न पाळता साखर वाढली तरी चालेल.... 

जेवढी रक्तातील साखर जास्ती राहील तेवढे microvascular complications वाढतील . म्हणजे किडनी , डोळे , मेंदू यासारख्या ठिकाणी रक्तवाहिन्यात साखर साचून इतर धोके वाढतील.

थोडक्यात हायपोग्लायसेमिया आणि  हायपरग्लायसेमिया या दोन्ही चा  सुवर्णमध्य साधून आपली साखर साधारण उपाशीपोटी 100 ते 120 आणि जेवणानंतर 140 ते 170 यादरम्यान ठेवण्याचा प्रयत्न वयोवृद्ध डायबेटीसच्या रुग्णांनी करणे गरजेचे आहे .

Normal BSL level
 
( F ) = 70 - 110 mg /dl 
( PP ) = 70 - 140 mg / dl

HbA1C 
Non Diabetic = less than 5.7 
Pre Diabetic = 5.7 to 6.4 
Diabetic = more than 6.5 

सध्या इथेच थांबू !

🌹डॉ पद्मनाभ केसकर
EMS Instructor , रुबी हॉल , पुणे 
मोबाईल - ९७६२२५८६५०

Comments

  1. Replies
    1. माझे वडील रक्तातील साखर कमी होत असलेले १९७७-७८ पासून आजारी होते, त्यासाठी त्यांनी पुणे येथे बरेच दवाखाने, डॉक्टर,ससून येथे उपचार घेत होते. परंतु कोठेही योग्य निदान झाले नाही.ससून येथे लागोपाठ २ ते ३ महिने आंतर रुग्ण दाखल होते,त्यांना फीट येत असेन म्हणून त्यावरची औषधी घेत होते, पण काहीही उपाय झाला नाही,त्यावेळी दर वाडिया रुबी हॉस्पिटल हे तेथे सेवाभावी सेवा देत होते ,त्यांनी सुचवले नुसार रुबी हॉस्पिटल येथे दाखल केले ,
      EEG, व मेदुचा cT स्कॅन काढून झाला,सर्व तपासणी झाली तरीही काही निदान झाले नाही
      त्यांना साखर कमी होते हेच मुळात लक्षात येत नव्हते
      एका दिवशी त्यांना हॉस्पिटल मध्येच त्रास झलेने त्यावेळी त्यांचे रक्त घेणेत आले,
      तपासणी अंती रक्तातील साखर अतिशय कमी असल्याचे सापडले
      मग साखर कमी का याचे कारण शोधण्यात आले
      तेव्हा रक्तातील इन्सुलिन चे प्रमाण वाढले असे दिसून आले
      आता प्रश्न असा पडलं की त्यांना मधुमेह नाही,ते त्यावर औषधी घेत नाही मग असे का?
      शेवटी पोटाचा ct scan केलेवर pancreas ची वाढ दिसून आली.
      त्यामुळे इन्सुलिन हे जास्त प्रमाणात शरीरात येत होते हे निदान झाले
      शेवटी रुबी हॉस्पिटल येथे सदर स्वादुपिंड ची गाठ काढणे त आली Dr deshpande यानंतर वडिलांना वरिर त्रास कधीच झाला नाही
      पण त्यांना मधुमेह झाला व त्यासाठी त्यांना जिवंत असे तोवर मधुमेह चे उपचार घ्यावे लागले

      ते १९८४ आप्प्रेशन नंतर ८-१९९७ पर्यंत जिवंत होते
      माहितीसाठी सादर
      नरेंद्र दिगंबर तळेले
      Chief Pharmacist Officer

      Delete
  2. Dr Amar Shah Dehuroad Excellent Explaination Sirji

    ReplyDelete
  3. सोप्या भाषेत योग्य ते मार्गदर्शन

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

💓ECG झाला सोप्पा !💓भाग - १

💓ECG झाला सोप्पा💓भाग २

💓ECG झाला सोप्पा💓भाग - ३