गब्बर से तुम्हे सिर्फ एक ही आदमी बचा सकता है और वो है ...खुद गब्बर ! # Omicron Stories- part 2
#कोरोना_डायरीज #Omicron_Stories Part- 2 👺 गब्बर से तुम्हे सिर्फ एक ही आदमी बचा सकता है और वो है ...खुद गब्बर ! 🌹डॉ. पद्मनाभ केसकर Emergency Management Expert , Pune शोले चित्रपटातील हा डायलॉग आहे ... गब्बर से तुम्हे सिर्फ एक ही आदमी बचा सकता है और वो है ...खुद गब्बर ! ... आता याचा संबंध आपल्या कोरोनाशी किंवा नवीन आलेल्या ओमिक्रोन शी काय आहे याचा तुम्ही नक्की विचार करत असाल ... तर हि एक थेरी आहे किंवा एक पॅरलल विचार आहे ... हा ओमिक्रोन च जगाला कोरोना च्या विळख्यातून बाहेर काढू शकतो ! .. किंवा दुसऱ्या शब्दात कोरोना चा ओमिक्रोन हा अवतारच जगाला कोरोनाच्या संकटापासून वाचवू शकतो !! ( काट्याने काटा काढणे ..) ©️डॉ. पद्मनाभ केसकर आता ही विचारधारा कशी पुढे आली आणि त्याच्या मागचा बेस् काय आहे ते बघू ... मागील भागात आपण बघितलं की केवळ कोरोनाचाच व्हायरस असे नाही तर सर्वच व्हायरस हे जीवसृष्टीत टिकून राहण्यासाठी स्वतःमध्ये जनुकीय बदल घडवत असतात ज्याला आपण mutation असे म्हणतो. या जनुकीय बदलांमुळे तो व्हायरस टिकून राहण्यासाठी स्वतःमध्ये जे अंतर्बाह्य बदल घडवतो त्यामुळे त...